Ad will apear here
Next
कसोटी बळींचा विक्रम


भारताचा अद्वितीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव याने १९९४ साली आजच्या दिवशी (आठ फेब्रुवारी) कसोटी क्रिकेटमध्ये ४३२वा बळी घेऊन न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीचा सर्वाधिक बळींचा विक्रम मोडला.

त्यानंतर आणखी दोन विकेट मिळवून कपिलने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; पण त्यांचा हा विक्रम आणखी सहा वर्षे अबाधित राहिला. कर्टनी वॉल्शने २०००मध्ये हा विक्रम मोडला.



मध्यमगती तेज गोलंदाजी, मधल्या फळीत धडाकेबाज फलंदाजी व कल्पक आणि समर्थ नेतृत्व यामुळे कपिल देव भारताचा ऑल टाइम सर्वोत्तम खेळाडू मानला गेला. जगभरच्या श्रेष्ठ अष्टपैलू क्रिकेट खेळाडूंमध्ये कपिल देवचा समावेश होतो.



१९८३च्या विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता ठरला, तेव्हा नेतृत्व कपिलकडेच होते, हा निव्वळ योगायोग नव्हे.

कपिल देवच्या भारतीय क्रिकेटमधील कामगिरीस तोड नाही, हेच खरे!

- भारतकुमार राऊत

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NUSFCV
Similar Posts
विजयाचे तोरण... आजही ५० वर्षांपूर्वीची ‘ती’ सकाळ आठवली की अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात. १९७१मध्ये आजच्याच दिवशी अजित वाडेकरच्या भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्याच भूमीवर - पोर्ट ऑफ स्पेनमध्ये - सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला व परदेशातील विजयांचे जणू तोरण बांधले.
मूकनायक! ज्येष्ठ नेते व समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला.
गुरूचा वाढदिवस! ज्याच्या पत्रिकेतील गुरू बलवान, तो आयुष्यात यशस्वी ठरतो व दुसऱ्यांवर प्रभुत्व गाजवतो, अशी समजूत आहे. अशा सर्वशक्तिमान गुरूला प्रणाम! ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी गुरू या सूर्यमालिकेतील सर्वांत मोठ्या ग्रहाचा शोध लावला तो आजच्याच दिवशी (सात जानेवारी) १६१० या वर्षी.
... आणि निनादली ‘तुतारी’! स्फूर्तीचे कवी कै. कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांनी लिहिलेली ‘तुतारी’ ही स्फूर्तिदायी कविता प्रथम प्रसिद्ध झाली, त्या घटनेला आज (२७ मार्च) १२८ वर्षे झाली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language